सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न
सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
सिटी बेल | पनवेल |
कोरोना विषाणू थैमान घालत असताना जिथे तमाम जनता अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडत होती त्याच वेळी पनवेल मधल्या दोन ध्येय्य वेड्या पत्रकारांनी काहीतरी जाज्वल्य पूर्ण करून दाखवण्याच्या इराद्याने पत्रकारिता क्षेत्रात हटके प्रयोग केला. पारंपारिक पत्रकारितेतून डिजिटल पत्रकारितेत झेप घेत असताना डिजिटल वृत्त समूहाची स्थापना केल्यानंतर या दोन ध्येयवेड्या पत्रकारांनी मागे वळून पाहिलेले नाही.आज सिटी बेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् चे तब्बल 5 हजार डाऊनलोड झाले आहेत.सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील आणि मंदार दोंदे, टेक्नॉलॉजी डायरेक्टर वैभव सोनटक्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोना विषाणू मुळे लॉक डाऊन लागण्याच्या उंबरठ्यावर पत्रकार मंदार दोंदे आणि पत्रकार विवेक मोरेश्वर पाटील यांनी दैनिक कर्नाळा हे मराठी दैनिक काही काळाकरता बंद ठेवून डिजिटल पत्रकारितेमध्ये झेप घेतली. वैभव सोनटक्के यांच्या सारखे डिजिटल क्षेत्रातील मास्टर माईंड यांची या पत्रकार द्वयीला साथ लाभली.वैचारिक सम्यामुळे या त्रयीने अल्पावधीत वृत्त समूहाचे बस्तान बसविले.बहुभाषी न्यूज पोर्टल, अँड्रॉइड ॲप्लिकेशन, इंग्रजी साप्ताहिक, सिटी बेल एज्युकेअर अँड इनोवेशन्स, सिटी बेल मीडिया मॅनेजमेंट अँड पब्लिसिटी आणि सिटी बेल रेडिओ अशी प्रोडक्ट्स घेऊन या पत्रकार द्वयींनी सिटी बेल वृत्त समूहाची सुरुवात केली.
कोरोना चा कालखंड, आवक आटलेली, जाहिरातींचा रतीब पूर्णपणे थांबलेला, वृत्तपत्रांची छपाई थांबलेली, सारे जग आपापल्या घरात जीव वाचविण्याच्या इराद्याने बसले असताना या पत्रकार द्वयींनी मात्र मोठ्या नेटाने वृत्त समूहाचा यज्ञ प्रज्वलित ठेवला.
संकटाने खचून न जाता त्याच संकटाचे संधीत परिवर्तन करत सिटी बेल न्यूज पोर्टल ने पहिल्या तीन महिन्यातच एक कोटी व्ह्युअर्स चा टप्पा पार केला.गुगल सर्च मध्ये 180 कोटी नेम सर्च मधून सिटी बेल प्रथम प्रकट होऊ लागले. आजमितीला सिटी बेल चे 10 कोटी पेक्षा अधिक रीडर्स आहेत.सिटी बेल इंग्लिश विकली अल्पावधीतच वाचकांची पहिली पसंती बनलाय.डेली हंट सारख्या न्युज अपडेट वर सिटी बेल चे प्रोफाईल बनले असून आता तिथून देखील वाचकांना अपडेट्स मिळतात.त्यातच सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न झाल्याने वृत्त समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.अर्थातच त्यामुळे सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील आणि मंदार दोंदे, टेक्नॉलॉजी डायरेक्टर वैभव सोनटक्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिटी बेल रेडिओ, हे समूहाचे आगामी आकर्षण असून जे जे उदात्त, उत्तम त्याचा पाठलाग करत, नाविन्याची कास धरत आमची आगामी प्रोडक्ट्स वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांच्या सेवेत रुजू होतील असे वृत्त समूहाच्या वतीने सांगण्यात आले.
Be First to Comment