सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •
रोहे तालुक्यातील देवकान्हे १५ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस देऊन लसिकरणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.
येथील सरपंच तथा रायगड भूषण लोकशाहीर वसंत भोईर उपसरपंच सूरज कचरे,ग्रा.पं.सदस्य दयाराम भोईर,यांचे प्रयत्न व सहकार्यातून सदर लसिकरण मोहिम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली. यावेळी
श्रमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक जगताप, सहा.शिक्षक नरेंद्र माळी,महेंद्र जवरत, आरोग्य सेविका , ए.एस.मखर, शिल्पा पाटील, एस.पी.चिंचाळकर,आशा सेविका वेदिका टेंबे,स्वाती ठाकूर,आदी उपस्थित होते.
या लसिकरण कार्यक्रमातंर्गत श्रमिक विद्यालय चिल्हे येथील १५ वर्षे वयोगटातील सुमारे ५० विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक दुसरा डोस देण्यात आला.सरपंच वसंत भोईर,उपसरपंच सूरज कचरे व सदस्य दयाराम भोईर यांच्या सहकार्याबद्दल श्रमिक विद्यालय चिल्हे यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Be First to Comment