गुड न्यूज : कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे परत मिळणार
सिटी बेल | पनवेल |
अवसायनामध्ये गेलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारी ही बातमी निश्चितच स्वागतार्ह आहे. ठेवीदारांना असणाऱ्या विमा संरक्षणपोटी मिळणाऱ्या रकमेचे 374 कोटी रुपये बँक ऑफ बडोदा च्या खात्यात जमा झाले असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
प्राप्त माहिती खरी असून ही रक्कम बँक ऑफ बडोदा मध्ये जमा झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये विमा संरक्षण असणाऱ्या खातेदारांना मिळणाऱ्या रकमा अदा केल्या जातील. यासाठी सर्व संघर्ष शेतकरी कामगार पक्षाने केला असून, ठेवीदारांना आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे समाधान लाभत आहे.
– आमदार बाळाराम दत्तुशेठ पाटील.
Be First to Comment