Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांचा परदेशात डंका

कामगार नेते महेंद्र घरत यांची ITF उपाध्यक्ष पदी फेरनिवड !

सिटी बेल ∆ पनवेल ∆

देशातील कामगार शेत्रातील दिग्गज नाव, गेली ३८ वर्ष कामगार कल्याणासाठी आहोरात्र झटणारे, हजारो कामगारांचे संसार सुखी करणारे NMGKS संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय इंटकचे चिटणीस, कामगार नेते महेंद्रजी घरत यांची इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन (ITF) या जागतिक बलाढय संघाच्या दिनांक २१ मार्च २०२४ रोजी ITF लंडन कार्यालयात झालेल्या निवडणुकीत ITF लॉजिस्टीक्स् वेअर हाऊसिंग सेक्टर च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या महेंद्रजी घरत याच्या निवडीमुळे रायगड जिल्हयात विशेषत: पनवेल- उरण तालुक्यामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. १९८७ साली लोकनेते स्व.दि. बा. पाटील, कामगार नेते स्व.दत्ता सामंत, स्व.दत्ता पाटील, स्व.दत्तुशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझगाव डॉकच्या कामगारांसाठी  लढा उभारून त्यांना कायम करून वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या कामगार क्षेत्रातील झंझावाती कारकीर्दीची सुरवात केली.

३८ वर्ष न थकता न दमता कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला वसा अखंडपणे त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. आपल्या संघटनेच्या १५००० कामगारांचे जे.एन.पी.टी, तळोजा, पाताळगंगा, बेलापूर, महाड, पेण या औद्योगीक वसाहतींमध्ये नेतृत्व करत असताना महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय इंटक, जगातील शिर्ष संघटना ILO वर भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजची त्यांची निवड त्यांच्या कामगार क्षेत्रातील कामगिरीची पोचपावतीच आहे.

रायगड कॉंग्रेसची धुरा सांभाळत संघटनेच्या माध्यमातून हजारो युवकांना उदर निर्वाहाचे साधन त्यांनी मिळवून दिलेले आहेत. तर सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रचंड कार्यामुळे ते सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हात आनंदमयी वातावरण आहे. भारतीय कामगार क्षेत्रातील हि मान उंचावणारी घटना आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.