Press "Enter" to skip to content

कामगार नेते मा. श्री.महेंद्रशेठ घरत यांचा बाल्मर लॉरी व्यवस्थापनाला दणका !

बाल्मर लॉरी कामगारांच्या धरणे आंदोलनाला यश !

सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆

बाल्मर लॉरीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी माध्यस्थीमुळे आज यश मिळाले.

कंत्राटदार बदलल्या मुळे बऱ्याच दिवसांपासुन संघटनेमार्फत कामगारांना त्याच पगारावर पुर्ववत कामावर घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु नवीन कंत्राटदार 15 ऐवजी फक्त 7 कामगारांना किमान वेतणावर घेण्यास तयार होते.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या दणक्याने व्यवस्थापन आज वठणीवर येऊन 12 कामगारांना अगोदरच्या पगारावर कामावर घेण्यास तयार झाले व उर्वरित 3 कामगारां संदर्भात चर्चा करून मार्ग काढू असे चर्चेअंती ठरले. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.