
पनवेल : प्रतिनिधी
भीमाशंकरच्या जंगलाचा होणारा विनाश सामान्य लोकांच्या लक्षात यावा आणि आपली संवेदनशीलता दडपून न ठेवता, अगदी निष्क्रिय राहण्यापेक्षा विरोध करावा यासाठी पनवेल मधील निसर्गप्रेमीनी पुढाकार घेऊन विविध संस्थेची साधारणत ३० धडपडी माणसे एकत्र जमून मूक निदर्शने केली.
नेचर फ्रेंड सोसायटी संस्था जि वन्य प्राणी/ पशु/ पक्षी/ साप यांच्यासाठी २०१६ पासुन काम करते आहे. यातील ऊल्हास ठाकूर/ संतोष ऊदरे / आर्यन ऊदरे/ विघ्नेश पाटील / म्हस्कर भगीनी इत्यादी सदस्य यावेळी सहभागी झाले होते.
पनवेल ट्रेक्स ग्रुप जो गेली अनेक वर्षे आदई डोंगरावर वृक्षारोपण करून ति जगवण्यात यशस्वी झालेत. ॲडव्होकेट नागेश हिरवे / अडव्होकेट प्रगती ठाकूर तसेच इतर सदस्य तसेच निसर्गमित्र पनवेल संस्था जी गेली ४२ वर्ष पनवेल तालुक्याबरोबर रायगड जिल्हातही निसर्ग संवर्धनांचे कार्य करीत आहेत. सुरेश रिसबुड / धनंजय मदन / शेखर तारे / अक्षय गायकर / सेजल पाटील / वांसती थिटे इत्यादी सदस्य यावेळी उपस्थित होते .
त्याचबरोबर बल्लाळेश्वर तलावाभोवती वृक्ष लाऊन त्यांना पाणी घालून जगवणारे निसर्गप्रेमी / वृक्षप्रेमी तसेच अनेक नागरीक उपस्थित होते. निनाद पाटील / प्रल्हाद बोडके व इतर सदस्य हे देखील उपस्थित होते.

हे मुक प्रदर्शन सुरु असताना भिमाशंकर परीसरात रहाणाऱ्या दोन महिलाही त्यांच्या बाळासहीत आल्या होत्या , पनवेल बरोबर कुर्ला/ मुलुंड / कर्जतचौक / कामोठे येथील वृक्षप्रेमी नागरीकांनी तेथे उपस्थित राहून वृक्षप्रेमी संघटनांना पाठींबा दिला .



Be First to Comment