
भाजप आमदार विक्रांत पाटील सिडको विरोधात आक्रमक
नवी मुंबई : प्रतिनिधी
खारघर बेलपाडा आदिवासी वाडीवर सिडको अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत , यावेळी घटनास्थळी भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी भेट दिली व सिडको अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले…
या घटनेत जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करून सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली.
मात्र सिडको प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून कारवाईमध्ये अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिले आहे..


Be First to Comment