कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली बकुल अॅरोमॅटिक्स रसायनी मधील कामगारांना तब्बल ८,१०० रुपयांची घवघवीत पगार वाढ
सिटी बेल ∆ उलवे ∆
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज रसायनी येथील मे. बकुल अॅरोमॅटिक्स केमिकल कंपनी रसायनी मधील कामगारांना तब्बल ८,१०० (आठ हजार शंभर ) रुपयांचा तीन वर्षांकारिता घवघवीत पगार वाढीचा यशस्वी करार शेलघर येथील कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
संघटनेच्या वतीने, संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीतील हा चौथा यशस्वी करार आहे. हा वेतन करार संपन्न होत असतांना कामगार नेते व संघटनेचे अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले कि, मी संघटनेत प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे आज संघटनेचा हा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहात. प्रत्येकाला येथे काम करण्याची संधी दिली जाते, त्याला अधिकार दिले जातात त्यामुळेच संघटनां आज मोठया प्रमाणात वाढलेली दिसत आहे. जवळ जवळ २००ते २५० युनिट आज संघटनेकडे आहेत या सर्वांना सांभाळण्याचे काम संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. शेवटी माझं कामगार आणि व्यवस्थापण यांना एवढच सांगणं आहे कि आपण एकमेकांचे सोबती आहात दोघानीं हातात हात घालुन चालले पाहिजे. कामगारांनी कंपनीचे नुकसान होईल असे कुठले कृत न करता सामोपचाराने विचार विनिमय करून युनियनच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत आणि व्यवस्थापणाने सुद्धा कामगार वर्गाची पिळवणूक न करता त्यांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे, त्यांना त्यांचा हक्क दिला गेला पाहिजे. शेवटी कंपनी आणि कामगार या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर प्रश्न निर्माण होणार नाहीत.
गेल्या सहा महिन्यातील संघटनेच्या माध्यमातून हा आठवा करार आहे.शेवटी संघटना हि गोर-गरीब कामगारांसाठी आहे.२४ तास संघटना कामगारांसाठी रस्त्यावर लढत आहे. व त्यांना न्याय देण्याचा काम आम्हीं करत आहोत.उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. असे शेवटी त्यांनी सांगितले
या करारा प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,बकुळ ऑरोनॅटिक्स केमिकल कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर – सि.एस. उपाध्यक्ष, पर्सनल मॅनेजर आर.एच. गायकवाड, फॅक्टरी मॅनेजर दिलीप पै. तसेच कामगार प्रतिनिधी प्रकाश खोपडे, ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते .
Be First to Comment