
पेण, ता. 30 (वार्ताहर) : राज्यातील पावसाने मारलेली दडी लक्षात घेता आणि सर्वत्र पाणी टंचाईची दाहकता वाढत चाललेली असल्याने राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आदेश जारी केल्याने त्या आदेशानुसार पेण तालुक्यातल खरोशी, दुरशेत येथे वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यभर दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता ज्या ग्रामपंचायत मध्ये वाहणारे ओढे, नाले आहेत त्या ठिकाणी लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले असताना पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देशाने पाणी अडवून साठा होत असून यामुळेच भूजलपातळी वाढ होऊन रब्बी पिकांना तसेच गुरांना पाणी उपलब्ध होऊन यामुळे भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईची झळ आपल्याला बसणार नाही त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यावेळी सांगितले.यावेळी पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, जिप. सदस्य जनार्दन भस्मा, जोमा दरवडा, महेश पाटील आदिंसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



Be First to Comment