
पेण, ता. 30 (वार्ताहर) : पेण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत बोरगाव येथील सुधीर मारुती पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते उपसभापती नितीन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सभापती हरिश्चंद्र पाटील यांनी घोषित केले.यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ यांनी नवनिर्वाचित उपसभापती यांचे अभिनंदन केले.या बोलताना त्यांनी सांगितले की तालुक्यातील शेतकऱ्यांसह डोंगरदऱ्यातून येणाऱ्या आदिवासी बांधवाला सुद्धा या बाजार समितीच्या माध्यमातून आपण न्याय देण्याची भूमिका ठेवणार आहोत.



Be First to Comment