सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केशरचंदजी आनंदरामजी बांठिया माध्यमिक विद्यालय तसेच एन, एन. पालीवाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १९८३ पासून आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या मैदानातील भव्य शामियान्यात माजी विद्यार्थी महामेळावा मोठ्या उत्साहात साजरा कार्यात आला.
यात सर्व निवृत्त माजी शिक्षकांचा भव्य सत्कार, स्मरणिकेचे प्रकाशन, मनोरंजनात्मक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव करण्यात आला. महामेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी आमदार प्रशांत ठाकूर, मेळाव्याचे मार्गदर्शक तथा शाळेचे मुख्याध्यापक बी, एस, माळीसर, जेष्ठ पर्यवेक्षक जे. के. कुंभारसर, स्मरणिकेच्या संपादिका निवृत्त शिक्षिका सुलभा निंबाळकर त्याचबरोबर उपमुख्याध्यापक सी. के. तीरमलेसर, जेष्ठ अध्यापक वाय. एस. सूर्यवंशीसर, पर्यवेक्षक अजित गोखलेसर आणि माजी विद्यार्थी मा. नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल ता.वकील संघटनेचे अध्यक्ष मा. नगरसेवक मनोज भुजबळ, मा. जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, उद्योजक महेश पाटील. मा. नगरसेविका सुशीला घरत आदी मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थी आणि महामेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या आपल्या शाळेत पुन्हा जावं आणि व्यस्त जीवनशैलीतील वेळ काढून आपल्या शाळेतल्या जुन्या मित्रांना भेटता यावं यासाठी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करायला हवा अशी संकल्पना आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करणारी माजी विद्यार्थिनी स्नेहा पाटील हिने मुख्याध्यापक माळी सर आणि मुख्य पर्यवेक्षक कुंभार सर यांचे समोर मांडली त्यांनी ती मान्य केली. त्यांच्या मार्गदर्शना खाली शाळेची वेबसाईट तयार करून त्याला समाज माध्यमांवर प्रसिध्दी दिली. समन्वय समिती नेमली त्या नंतर स्वंयसेवक, दानशूर व्यक्ती व सुमारे 5000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी माध्यमांवर जोडले गेले. वेगवेगळे विचार एकत्र आले आणि शाळेत ज्ञान दानाचे महत्कार्य केलेल्या माजी मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक आणि मान्यवरांचा हृद्यसत्कार या माजी विद्यार्थी मेळाव्यात करावा. त्याचबरोबर विद्यार्थी सत्कार, स्मरणिका प्रकाशन, खेळ, मानवतेवर आधारित नाटिका, गीत गायन, नृत्य, करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहभोजन या कार्यक्रमासोबतच ग्रुप फोटो आणि सेल्फी साठी स्टॅन्ड उभारण्यात यावा अशा सूचना झाल्या. त्या नुसार कार्यक्रमाची मांडणी झाली आणि हा महामेळावा पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी समन्वय समिती मधील संजय अल्हाट, स्नेहा पाटील, डॉ. रमेश यादव, विनोद वाघमारे, स्वप्नील वाडकर, अमर शेळके, अॅड.श्रीकांत म्हात्रे, डॉ. सुषमा पाटील. तुषार देशपांडे, अनिता भुजबळ, अॅड. महेश केणी, इंद्रजीत कानू, सुरेश शिंदे, अॅड.मधुरा तायडे, अॅड. सचिन कोंडीलकर, ज्ञानेश्वर लोहके, जीवन शेळके, महेश पाटील, प्रसाद घोडेकर, स्वप्ना तलाठी, प्राची जीडगी, हितेश पाटील, आरती बिले, पुरुषोत्तम बुचडे आणि अॅड. राजेश खंडागळे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडून अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सुषमा पाटील यांनी तर सूत्रसंचालन मुकेश उपाध्ये यांनी केले.
कार्यक्रमात विशेष सहकार्याबद्दल प्राजक्ता केंडे, सिद्धेश्वर बिराजदार, सचिन जकाते, जिग्नेश पंड्या, डॉ. अमोल मगरे, महेश भिंगारकर, निलेश भोसले, रुपेश पाटील, राहुल पोपेटा, भरत पाटील, अविनाश प्रजापती, सोनू प्रजापती, ज्योती मोरे, रोहन शिरधनकर, डॉ. ऋषिकेश पाटील, प्रशांत गांगर्डे, विद्या कुदळे, योगिता भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्मरणिकेतील उत्कृष्ठ लेखांसाठी विभावरी उरणकर, प्रीती धोपाटे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी किंवा इतर कारणासाठी दूर गेलेल्या आपल्या वर्ग मित्रांना पुन्हा एकदा या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने भेटता आले . आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणासोबतच खेळभावना, शिस्त, आदर, माणुसकीही शिकवली त्या आदर्श माजी शिक्षकांचे आशीर्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. या बद्दल मनोमिलनाच्या, मैत्रीच्या, माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोठ्या संखेने उपस्थित राहिलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महामेळावा आयोजनाबद्दल के. आ. बांठिया हायस्कूल माजी विद्यार्थी समितीला धन्यवाद दिले.
बांठिया शाळेचा सुवर्ण आणि अमृत महोत्सवही साजरा करू, आ. प्रशांत ठाकूर यांची ग्वाही
आपले शिक्षक, गुरु जेव्हा आपल्याला भेटतात तिच आपली गुरु पौणिमा आणि जेव्हा जेव्हा गुरूंचे आशीर्वाद मिळतात तेव्हा तेव्हा आपला उत्साह वाढतो. आज आमचा उत्साह, आनंद द्विगुणीत झाला हि सुवर्ण संधी या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मिळाली. असे भावोदगार महामेळाव्यात उपस्थिताना संबोधित करताना शाळेचे माजी विद्यार्थी आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.
महामेळाव्याच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी माजी विद्यार्थी समिती व आयोजकांना धन्यवाद देत हा आनंद आणि उत्साह असाच अनेक वर्ष अनुभवता यावा यासाठी बांठिया हायस्कूलचा २००७ सालचा रौप्य महोत्सव, आजचा माजी विद्यार्थी महामेळावा जसा साजरा झाला त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात पुढे येणारा सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सवही साजरा करू अशी ग्वाहीही शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आ. ठाकूर यांनी उपस्थिताना दिली.
आमदार ठाकूर पुढे म्हणाले की शाळेचे आणि आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत हे ऋण कधीच न फेडता येण्यासारखे आहे. आपण नेहमीच त्यांच्या ऋणात राहू अशी कृतज्ञता व्यक्त करून आदर्श म्हणून शाळेचे नाव टिकून ठेवण्यासठी येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात यश संपादन करावे अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.
Be First to Comment