सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत शहरातील सर्वात जुने अशा श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथे भारतरत्न डॉ एपिजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले होते.
श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे चिटणीस संदीप भोसले,पद्माकर गांगल,ग्रंथपाल रामदास गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. वाचन प्रेरणा दिनाचे निमित्त साधून वाचनालयाने एक अगळा वेगळा शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या माध्यमातून सारांशलेखन स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये कर्जत शहरातील आठ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेखक पद्माकर गांगल यांनी महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाचनालयाने वाचन प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून कथा वाचन आणि त्याचे सारांश लेखन करण्याचे कसब विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे.असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांची आकलन शक्ती वाढते असा विश्वास गांगल यांनी व्यक्त केला.
या वाचन दिन कार्यक्रमाला श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष गायत्री परांजपे, चिटणीस संदीप भोसले, सहचिटणीस सदानंद जोशी, कार्यकारिणी सदस्य राजेश थत्ते, ग्रंथपाल रामदास गायकवाड, सहग्रंथपाल योगिता साखरे आदी उपस्थित होते.
Be First to Comment