Press "Enter" to skip to content

गुणवंत विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन

नागोठणे लायन्स क्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने नागोठणे शहर व पंचक्रोशीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. नागोठण्यातील एस.टी. स्थानकालगत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पांडुरंग शिंदे यांच्याच सहकार्याने नुकताच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नागोठणे लायन्स क्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू व खाऊ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. इयत्ता १० वी व १२ वी. मधील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान व पुढील आयुष्यातील प्रगती कशी करावी यावर मार्गदर्शन हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे नागोठणे लायन्स क्लब सातत्य राखुन आयोजित करीत आहे.

याशिवाय ऐनघर येथील श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना लायन विजय गणात्रा यांच्या सहकार्याने २४० वह्यांचे, २८ स्कुल बॅगचे व खावुचे वाटप एम.जे.एफ. लायन यशवंत चित्रे व ला. पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमला एमजेएफ लायन यशवंत चित्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शाळेत दिवसाही कालोख पडत असल्याने शाळेची दुरावस्था पाहता या शाळेला ट्युब लाईट देण्याचे आश्वासन पांडुरंग शिंदे यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, लायन यशवंत चित्रे, लायन लायन दिपक गायकवाड, लायन सिद्धेश काळे, मुख्याध्यापक अनिल वाघ, सहाय्यक शिक्षक अजित देशमुख, सहाय्यक शिक्षक शैलेश गजभार, सहाय्यक शिक्षिका स्नेहल पाटील व मनिषा पाटील तसेच विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.