
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा पगारवाढीचा करार
उलवे : प्रतिनिधी
केंद्रसरकारची कामगारांसाठीची ध्येय धोरणं सतत बदलत असतांना कामगारांची नोकरी टिकवून त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करत असतात. सध्या कंटेनर फ्रेट स्टेशन (CFS) च्या कामगारांची वाईट अवस्था आहे. परंतु कंपनी व कामगार यांच्यामधे समतोल राखत कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे मध्यस्थी करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. ओल्ड मर्स्क जे.एन.पी.टी. येथील कामगारांच्या पगारवाढीचा करार ११ मार्च रोजी संपन्न झाला.
या करारनाम्यानुसार कामगारांना ८ वर्षासाठी १८००० रुपये पगारवाढ, LTA – ११००० रुपये मेडीक्लेम पॉलीसी ३ ते ५ लाख रुपयांची. तसेच दरवर्षी बोनसमध्ये २००० ते २७५० रुपये वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारनाम्याप्रसंगी न्यू मँरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील तर मर्स्क कंपनीचे एच आर हेड योगेश ठाकूर, फ्युचर्झ स्टफिंगचे COO चिराग जागड, तर कामगार प्रतिनिधी प्रशांत पाटील व मेघनाथ ठाकूर उपस्थीत होते.




Be First to Comment