
पेण, ता. 15 (वार्ताहर) : नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तम कामगिरी करत यातील दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक जण फरार झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे तसेच पनवेल शहरातील मोटारसायकल गेल्या काही दिवसापूर्वी चोरीला गेल्या होत्या त्यात टीव्हीएस कंपनीच्या मोटर सायकलची किंमत सुमारे 15 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार रवींद्र मुंढे
यांना गोपनीय बातमीदारामार्फत या चोरीमध्ये काही संशयितांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी सौरभ विजयकुमार ठाकूर (वय 28), रा.श्रिया वल्लभ बिल्डिंग व्हि.के हायस्कूल जवळ लाईन आली, पनवेल मूळ रा. हेमनगर कुसुंबळे ता.अलिबाग
आणि कुशल अधिकांत पाटील (वय 24), रा. कातळपाडा पो.कुसुंबळे ता. अलिबाग जि. रायगड यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी संबंधितांचा नागोठणे येथील मोटारसायकल चोरीत सहभाग असल्याची कबुली दिली असून पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत सन 2021 मध्ये घडलेल्या आणखी एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहितीही समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
यातील दोन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली असताना दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी सध्या फरार असल्याचे सांगत पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.मात्र या मोटारसायकल चोरांना अटक केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची या उत्तम कामगिरी बद्दल सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मानसिंग पाटील, सहा.फौज. संदीप पाटील, पोह./794 रविंद्र मुंढे, पोह./795 प्रतीक सावंत, पोह./799 अमोल हंबीर, पोह./1555 शरद फरांदे, पोह./1091 रणजितसिंह खराडे, पोह./1609 मनोहर सिरतार आणि पोशि./1849 प्रदीप खरात आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला होता.



Be First to Comment