Press "Enter" to skip to content

पेण वाशी येथे महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वाटप ; उमेद सारख्या योजनेतूनच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या — सभापती वैकुंठ पाटील

पेण, ता. 31 (वार्ताहर) : केंद्रासह राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना येत असताना उमेद सारख्या योजनेतूनच तालुक्यातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनल्या जात असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत व पंचायतराज विभागामार्फत राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान (उमेद) तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पेण पंचायत समिती नवीदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा वडखळ प्रभागाच्या वाशी येथे घेण्यात आली होती.या सभेला राजिप माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, सदस्य
प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, सदस्य
विवेक म्हात्रे, मेघा पाटील, भाजप जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला पाटील, कमल पवार, अस्मिता पाटील, वडखळ ग्रामपंचायत सरपंच शिवानी म्हात्रे, कोमल म्हात्रे, सुरेखा पाटील, शिरीष पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक नितेश म्हात्रे आदींसह बचत गटातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

तर शासनाकडून येणाऱ्या योजना योग्य रीतीने राबवण्यात येत असताना महिलांच्या बचत गटांना उमेदच्या माध्यमातून मिळणारा आर्थिक बळ त्यांच्यासाठी सक्षम होण्याचा पर्याय असून त्यांनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असे मत माजी जिप.अध्यक्षा निलीमा पाटील यांनी मांडले.या कार्यक्रमांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे 61 महिला बचत गटाद्वारे 4 हजार 992 व्यवसायासाठी 25 लाखापर्यंत कर्ज वाटपाचे धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.