
पेण, ता. 31 (वार्ताहर) : दिपावली हा सण सर्वांसाठी आनंदमय करणारा असल्याने या दीपावली सणानिमित्त पेण नगरपालिका आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज सखी मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शहरातील अनेक महिलांनी विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले की या मेळाव्याच्या माध्यमातून दीपावलीला प्रारंभ झाला असून हा मेळावा म्हणजे महिलांना स्वकर्तृत्वातून स्वावलंबनाकडे नेणारा असल्याचे त्यांनी सांगितले.पेण नगरपालिका आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून तीन दिवस पेण शहरामध्ये दिवाळी सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात अनेक महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वाने बनविलेल्या वस्तू आणि पदार्थ याचे स्टॉल लावून सदर मेळाव्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या दिवाळी सखी मेळाव्यात दिवाळी फराळ, रांगोळ्या आणि रांगोळ्या काढण्याचे साहित्य, साबण, सुगंधी उठणे, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, पणत्या, तोरणे, कापडी पिशव्या, आयुर्वेदिक औषधे, फराळ बनविण्याची भांडी यांसारख्या असंख्य वस्तूंचे स्टॉल यावेळी महिलांनी लावले होते.सदर मेळाव्याला आमदार रवीशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील,
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संयोगिता टेमघरे आदिंसह नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होते.
पेण नगरपालिका आणि इनरव्हील क्लब नेहमीच महिलांसाठी पुढाकार घेत असून त्यांचे उदाहरण आजच्या दिवाळी सखी मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला तयार केलेल्या वस्तू विक्री करून मिळालेल्या नफ्यातून येणाऱ्या दिवाळीमधील घरखर्चासाठी नक्कीच मदत होणार असल्याने यामधून महिलांना काम करण्याची एक वेगळीच प्रेरणा मिळाली असल्याची दिसून येत आहे.
वैशाली समेळ- महिला उद्योजिका



Be First to Comment