Press "Enter" to skip to content

“महेंद्रशेठ घरत हे मनाचा सच्चा माणूस असून, हवेहवेसे वाटणारे नेतृत्व आहे. अशा आश्वासक चेहऱ्याला योग्य संधी देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.”— हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष

उलवे : प्रतिनिधी

उलवे येथे उरण तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मान. श्री. विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाचे आणि कार्याचे मनापासून कौतुक केले.
महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेली उभारी, त्यांची प्रभावी रणनीती, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि दांडगा अनुभव यांचा आवर्जून उल्लेख करताना सपकाळ यांनी “महेंद्रशेठ घरत यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, दुसऱ्याला संधी देण्यासाठी दोन पावले मागे येण्याची विनोद म्हात्रे यांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही महेंद्रशेठ घरत यांच्याकडून कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखे असून, ते नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, असे सांगितले.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी ‘सुखकर्ता’ येथे स्वागत केले, तसेच तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली. काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा देणारा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.