Press "Enter" to skip to content

गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसने काढला मोर्चा

प्रतीकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध


पनवेल दि.१२(वार्ताहर):  राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आज पनवेल मध्ये काँग्रेस पक्षा तर्फे पायी मोर्च्या काढण्यात आला. यावेळी प्रतीकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.  
           

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटती जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्च्या काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,  महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉक्टर अमित दवे, अमित  लोखंडे,राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो त्रस्त ग्राहक शभंगाची झाले होते त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच गॅसची दरवाढ रद्द करा अशी मागणी केली. सदर मोर्च्या हा प्रांत कायार्लयापर्यंत नेण्यात आला.

यावेळी निवेदन देताना  पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटती जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगिलते की, शासनाने गडाची दरवाढ केली आहे. ती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. तससह यामुळे गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून ३ ते ४ हजाराला सिलेंडर ब्लॅक ने विकले जात आहेत. यासाठी शासनाने भरारी पथक नेमून संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे, तर नगरसेवक हरेश केणी यांनी सुद्धा मोदी सरकारचा निषेध करून गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल बंद पडली आहेत. यातून महागाई वाढणार आहे व कित्येकांच्या उद्योग धंद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.