व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी खुशखबर ! मोठ्या फाईल्स ट्रान्सफर करता येणार… अगदी चित्रपट देखील ?
सिटी बेल • मुंबई •
लवकरच व्हॉट्सअॅप नवीन फीचर्स आणणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या आकाराच्या फाईल्समध्ये प्रवेश करण्यास तसेच शेअर करण्यास अनुमती दिली जाणार आहे.
या नवीन फीचर्समुळे तुम्हाला आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मित्रासोबत चित्रपट शेअर करणे देखील सोपे होणार आहे.
आत्तापर्यंत व्हॉट्सअॅपद्वारे समोरच्या व्यक्तीला केवळ 100MB आकारापर्यंतच्या फाईल शेअर करू शकत होतो. मात्र आता लवकरच व्हॉट्सअॅपवर एखादा चित्रपट किंवा एखादी मोठी फाईल ट्रान्सफर करता येणार आहे.
एका अहवालानुसार, व्हॉट्सअॅप लवकरच अर्जेंटिनामध्ये “मीडिया फाईल साइज” वैशिष्ट्याची चाचणी सुरू करेल, जे वापरकर्त्यांना 2 जिबीपर्यंत मीडिया फाइल्स शेअर करण्यास अनुमती देईल.
हे वैशिष्ट्य सुरुवातीला अर्जेंटिनामधील बीटा परीक्षकांपुरते मर्यादित असेल आणि हे वैशिष्ट्य लवकरच इतर प्रदेशांमध्ये आणले जाईल की नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.
दरम्यान आधुनिक काळात हे नवीन वैशिष्ट्य अधिक आवश्यक आहे. कारण व्हिडिओ सारख्या मीडिया फाईल्सचा आकार वाढत आहे.
Be First to Comment