Press "Enter" to skip to content

प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

केळवणे खार बंदिस्तीचा बंधारा तुटायच्या अवस्थेत..

सिटी बेल ∆ केळवणे ∆ अजय शिवकर ∆

उरण – पेण – पनवेल या तिन्ही तालुक्यांना जोडणारा सर्वात मोठा गाव म्हणजे केळवणे.. जवळजवळ दोन हजार एकर धान्य पिकणाऱ्या शेती असणारे सधन असे गावं. गावाच्या लोकांची हीच मुख्य उपजीविका,  परंतु गेल्या बारा वर्षांपूर्वी शेती आणि समुद्र यांच्यामध्ये असलेला खारबांधिस्त बांधारा फुटल्याने संपूर्ण शेतीमध्ये  समुद्राचे खारे पाणी शिरले. त्यानंतर काही राजकीय मान्यवरांनी आपापल्या परीने खारबंदिस्त बांधून शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

गेल्या काही वर्षात ओसाड आणि नापीक झालेली जमीन पूर्ववत होऊ लागली आहे, शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उत्साहाने व दमानं आणि मेहनतीने आपापली जमीन कसायला सुरुवात केली असताना, काही वाळू माफिया समुद्रातून वाळू चोरी करतात, त्यामुळे खारघर बंदिस्त ची पातळी खालावून ढलत चालली आहे व जागोजागी तडा जाऊन अगदीच तुटायच्या अवस्थेत आली आहे.

याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर आतापर्यंत केलेली  शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाऊन तोंडात आलेला घास जायची शक्यता आहे. एकीकडे शेतकरी आणि शेती वाचली पाहिजे असा नारा प्रशासनाचा होत असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रशासनाने या वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाई आणि खारबंदस्तिचा चोख बंदोबस्त करावा अशी सर्व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.