Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत७८ शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण; ग्रामीण भागातही संघटन विस्ताराला वेग देण्याचे मा.केंद्रीय मंत्री अनंतराव गीते यांचे निर्देश


पनवेल, दि.१२ (वार्ताहर) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत असून, शहरी भागातील ७८ शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्याने पक्षाच्या संघटन विस्ताराला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात ग्रामीण भागातही संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने नियुक्त्या पूर्ण करण्याचे निर्देश शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिले.

पनवेल विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक आढावा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित ‘सामना’चे पत्रकार संजय कदम यांचा अनंतराव गीते यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पनवेलच्या भूमीतून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजय कदम यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, नुकतीच मावळ लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रसाद भोईर यांचाही अनंतराव गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पनवेलसह ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शहरी भागातील संघटनात्मक नियुक्त्यांचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल अनंतराव गीते यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शिवसेनेची संघटनात्मक ताकद हीच पक्षाची खरी शक्ती असून, प्रत्येक शाखा जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहिली पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील व भरत पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, पनवेल महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या गटनेत्या लीना ताई गरड, माजी जिल्हाप्रमुख शिरीष बुटाला, विभागप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, बालेश भोजने, कैलास पाटील, रामदास गोवारी, विश्वास पेटकर तसेच नगरसेविका आर्या जाधव, महिला आघाडीच्या ज्योती मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरी भागातील नियुक्त्या पूर्ण झाल्यानंतर आता ग्रामीण भागाकडे शिवसेनेचे लक्ष केंद्रित झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून शाखानिहाय संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पक्षाने पावले उचलली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार या कार्यक्रमातून दिसून आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.