Press "Enter" to skip to content

नेरळ शहरात दुकान फोडून चोरट्याने लुटला लाखोंचा ऐवज

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

नेरळ – कळंब रस्त्यावर असणाऱ्या एका इलेक्ट्रिकल दुकानात अज्ञात चोरट्यानी दुकान लुटले आहे. दुकानातील रोख रक्कमे शिवाय काही किमती सामान असा लाखोंचा ऐवज चोरांनी लुटून नेला. हे चोर सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाले असून नेरळ पोलिसांनी या चाराचे फोटो समोर आणले असून नागरिकांनाही चोर व्यक्ती ओळखीची किंवा कुठे बघितली असल्यास नेरळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. नेरळ शहरात सध्या चोरीच्या घटनेवर पोलिसांचा अंकुश असतानाच दोन नेरळ पूर्व भागात येत असलेल्या नेरळ- कळंब या राज्य मार्गावरील साई मंदिर परिसरातील श्री समर्थ इलेट्रिकल्स दुकानात मध्यरात्री चोरी झाली. रोख रक्कम आणि दुकानातील किमती सामान असा लाखोंचा मुद्देमाल चोरून चोर फरार झालेत. ही घटना सर्व सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाली असून चोरांचा चेहेरा समोर आला आहे. दोन तरुण या दुकानात चोरी करताना दिसून येत आहेत.

घटनेची माहिती होताच नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस हनुमंत शिंदे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोरांचे फोटो प्रसार माध्यमातून व्हायरल केले असून नागरिकांना याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.