सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यातील गौरकामत मधील एका युवकाने कंपनीत भाड्याने चारचाकी गाड्या लावतो असे सांगून अनेक वाहन मालकांना गंडवले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्या तरुणाला अटक केले असून त्यातील काही चारचाकी वाहने पोलिसांनी जमा करून अधिक तपास करीत आहेत. सुमारे 60 चारचाकी गाड्यांचा घोळ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गौरकामत येथील निलेश लक्ष्मण देशमुख या 34 वर्षीय युवकाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात काही चारचाकी वाहने भाड्याने लावतो असे सांगून अनेक चारचाकी वाहने करार करून घेतली होती. यातील काही वाहनांचे भाडे काही महिने देऊन त्याने व्यवहार व्यवस्थित सांभाळला होता मात्र भिसेगाव येथील शिवनाथ नारायण कारखेले याना माहे 14 ऑक्टोबर 2022 ते 14 ऑक्टोबर 2023 पर्यंतचे चार लाख 80 हजार रुपये भाडे दिले नाही उलट त्यांची एम एच 04 – के आर – 1027 ही मारुती कंपनीची ईर्टीगा कार कराराचा भंग करून नेरळ येथे कोठेतरी गहाण ठेवली व कारखेले यांचा विश्वासघात केला.
याबाबत कारखेले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी निलेश देशमुख याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता तीस – चाळीस वाहनांपेक्षा जास्त वाहनांचा घोळ केला असल्याचे निष्पन्न झाले. यातील काही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशी सुरू केली आहे. चौकशी अंती काही वाहने सोडून देण्यात आली आहेत. मात्र देशमुख यास न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. रसेडे अधिक तपास करीत आहेत.
Be First to Comment