रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांकडून कोट्यावधींची फसवणूक
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण येथील संतेष थोरात याने शेकडो बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी पोलिस अधिक्षकांसह अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कडे लेखी तक्रारीचे निवेदन दिले आहे.
सदर व्यक्ती ही गेल्या दोन तीन वर्षांपासून नोकरी लावण्याच्या नावाखाली शेकडो तरुणांकडून कोट्यावधी रुपये लाटत असल्याने त्यांनी कोणत्याही तरुणाला नोकरीत समाविष्ट केले नाही.मात्र याला अनेक बेरोजगार तरुण बळी पडत असल्याने फसवणूक होत असलेल्या तरुणांना न्याय द्यावा अशा तक्रारीचे निवेदन हरिष बेकावडे यांनी दिले असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करीत आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून उपविभागीय पोलिस अधिकारी व पेण पोलिस निरीक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.पण तरीही फसवणूक झालेल्या तरुणांनी आपापल्या स्थानिक पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करावी.
सोमनाथ घार्गे – पोलिस अधिक्षक रायगड
Be First to Comment