गोवंशीय जनावरांची सुटका, एकास अटक
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची नेरळ – कळंब पोलिसांकडून सुटका करण्यात आली. जनावरे घेऊन जाणाऱ्या नाजीर तनवीर बुबेरे याला पोलिसांनी वाहना सोबत ताब्यात घेतले असून यात एका हिंदू शेतकऱ्याचे नाव समोर आले आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांनी नेरळ पोलीस ठाण्याचा नव्याने कारभार हातात घेतल्या पासून ही त्यांच्या पोलीस टीमने आठवड्या भरात केलेली दुसरी धडाकेबाज कारवाई आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी चोरी होते तर काही शेतकरी हे पैसे कमवण्यासाठी जनावरांची कत्तलीसाठी विक्री करताना दिसत आहेत परंतु कायद्याने गोवंशीय जनावरांची कत्तल करणे हा गुन्हा असल्याने या जनावरांची छुप्या पद्धतीने खरेदी विक्री केली जात असून त्यांना रात्रीच्या वेळेत कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याने गोरक्षक आणि पोलीस विभागाकडून या गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. 14 ऑक्टोबर रोजी नेरळ चिंकन पाडा येथून मालेगाव मार्गे निघालेल्या रस्त्यावर नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कळंब पोस्ट ठाण्यातील कर्तव्यावर असलेले निरंजन संजय दवणे या पोलीस शिपायाने एका पिकअप टेंम्पोचा संशय आल्याने पकडले असता यात चार गोवंशीय जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आल्याने चालक नाजीर तनवीर बुबेरे याला पोलिसांनी वाहना सोबत ताब्यात घेतले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात 75 वर्षीय परशुराम कान्हू मोगरे ह्या हिंदु शेतकऱ्याचे नाव दुसरा आरोपी म्हणून समोर आले. हा शेतकरी वांगणी येथील कुडसावरा येथील राहणारा आहे. चार जनावरे आणि वाहना सोबत असे ऐकून दोन लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. जनावरांची गो शाळेत सुखरूप रवानगी करण्यात आली. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेची माहिती घेत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस ज्ञानदेव दहातोंडे यांच्याकडे सोपविण्यात आला.
नेरळ पोलीस ठाण्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून शिवाजी ढवळे यांनी नुकताच दहा दिवसांपूर्वी कारभार हातात घेतला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आठवड्या भरात दुसरी धडकबाज कारवाई करण्यात आल्याने ढवळे यांच्या या कारवाई बद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Be First to Comment