
पनवेल (वार्ताहर) ः पटेल मोहल्ला परिसरातून हरवलेली मुलगी नगरसेवक राजू सोनी व त्यांचे सहकारी मंदा देसाई यांच्या प्रयत्नातून पनवेल शहर पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले.
सदरची मुलगी ही पटेल मोहल्ला परिसरातून हरवली होती. त्यावेळेस काही नागरिकांना ती हरवले असल्याचे लक्षात आले. त्यावेळी यातील एका इसमाने नगरसेवक राजू सोनी यांना फोनद्वारे कळवले. सदर मुलीचा शोध घेत असता वेळी सदर मुलगी मिरची गल्ली येथे एका ठिकाणी असल्याचे समजतले. त्यावेळी नगरसेवक राजू सोनी व त्यांचे सहकारी मंदार देसाई यांनी तत्काळ तेथे जाऊन त्या मुलीला आपल्या ताब्यात घेऊन स्वतःच्या गाडीत बसवून पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणली. व यांच्या ताब्यात दिले.
सदरची मुलगी हरवली आहे याची तक्रार तिच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाण्यात येऊन केली होती. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीच्या आईस फोन करून बोलवून सुखरूप त्या मुलीच्या आईच्या स्वाधीन केले. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस कर्मचारी व मुलीच्या आईने यांनी राजू सोनी व मंदार देसाई यांचे खूप आभार मानले.




Be First to Comment