
पेण, ता. ३० (वार्ताहर) : रायगड जिल्हा परीषद कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठीची विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून याकरिता कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी चे लक्ष पूर्ण करावेत अशा सूचना कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी दिल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची आढावा बैठक आज घेण्यात आली.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेण्यात येत असताना त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा तसेच काही नैसर्गिक रित्या येणाऱ्या नुकसानात हजारों शेतकरी उध्वस्त होतात त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिक विमा योजना ही लागू करण्याचा दृष्टिकोन ठेवला असून पिक विम्याच्या हप्त्यामुळे अनेक शेतकरी यापासून दूर जातात त्यामुळे ती ही रक्कम जिल्हा परिषदेतच्या कृषी विभागामार्फत भरली जाईल याचीही तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याचे सभापती वैकुंठ पाटील यांनी या बैठकीत सांगितले.यावेळी जिल्हा परीषद कृषी अधिकारी पवनकुमार नजन, कृषी समिती सदस्य ज्योती नागावकर, भस्मा बाळू, विलास शिंदे, नलिनी लोखंडे यांच्यासह तालुकास्तरील अधिकारी उपस्थित होते.




Be First to Comment