
प्रतिनिधी आवरे (नरेश गावंड )
आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील पवित्र सण होय. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयानी एकादशी होय हिंदू धर्मात वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्त हे विठुरायाच्या भेटीला पायी चालत जात असतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तर संत तुकारामांची पालखी ही देहू हून यासोबत जात असतात. म्हणजे वारी करत असतात या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पांडुरंगाचे दर्शनाची लागलेली आस ही प्रत्येक वारकरी पूर्ण करत असतो ती सुद्धा विठू नामाच्या गजरात.
अश्याच प्रकारे आवरे येथील भोलेनाथ मंदिरात सुद्धा श्रावणी सोमवार आरती समूहा तर्फे दरवर्षीप्रमाणे पारंपारिक विठुरायाच्या आरतीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. यासाठी प्रत्येक विठ्ठल भक्त हा विठू नामात तल्लीन होत असतो. श्रावणी सोमवार आरती समूहा तर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी सायंकाळी भोलेनाथाच्या मंदिरात भजन कीर्तन संगीत ताल मृदुंगाच्या साह्याने भक्ती गीत गायले जाते. मंदिर व मंदिर सभोवतालचा परिसर हा विठ्ठल नामाच्या नामस्मरणाने दुमदुमून जात असतो व विठुरायची पारंपारिक परंपरेनुसार आरती घेतली जात असते. यासाठी श्रावणी सोमवार आरतीतील विठ्ठल भक्त आपल्या सुमधूर आवाजाने भजन कीर्तन करत असतात.
यामध्ये प्रामुख्याने आवरे गावातील गोड गळ्याचे गायक नरेश गावंड, गजानन गावंड यांनी गायलेली सुमधूर विठ्ठल गीत अबीर गुलाल मन लागो रे लागो , देव माझा माझा भेटी लागे जीवा जय जय रामकृष्ण हरी अशी भजन गायली. त्या साठी तबला सोहम म्हात्रे, पखवाज मृणाल म्हात्रे, कोरस साठी ज्ञानेश्वर गावंड सर, गजानन गावंड, सोमनाथ म्हात्रे व आदी यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या निमित्त आवरे भोलेनाथ मंदिरात विठू नामाचा गजर हा नित्यनेमाने दुमदुमला.



Be First to Comment