श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण २ रे शिबीर संपन्न
सिटी बेल • श्रीवर्धन • केतन माळवदे •
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन मधे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्यांदा कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी, तहसीलदार, श्री. सचिन गोसावी, श्रीवर्धन जिल्हा उप रूग्णालयाचे प्रमुख, डॉ. मधुकर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने, विभाग प्रमुख प्रा किशोर लहारे, वाळवंटी आरोग्य केंद्र प्रमुख, डॉ. पांडे यांच्या नेतृत्वाखाली शिबीरार्थींच्या लसीकरणासाठी विषेश परिश्रम घेण्यात आले.
यावेळी एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी, प्रा. वाल्मिक जोंधळे, एन.एस.एस स्वयंसेवक तसेच वाळवटी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय कर्मचारी, सौ. कल्पना भुवड, सौ. योगीता पिळणकर, सौ श्रध्दा भोईनकर, श्री सौरभ तोंडलेकर यांचे विषेश योगदान होते. शिबीरात विद्यार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोज देण्याबरोबरच महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी यांनाही बुष्टर डोज देण्यात आला.
Be First to Comment