विठ्ठलवाडी येथे 105 वे अखंड हरिनाम सप्ताह
खाडीपट्टयातील हजारो नागरिक संगीत श्रीराम कथा श्रवणाचा घेणार लाभ
सिटी बेल ∆ महाड ∆ रघुनाथ भागवत ∆
भूवैकुंठावरील वारकऱ्यांचे परमदैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या कृपाप्रसादाने व थोर संतांच्या आशीर्वादाने, साधूजणांच्या सहवासाने व थोर सत्पुरुषांच्या सुकृतीने पुनीत झालेल्या छ.शिवरायांच्या पावन भूमीतील विठ्ठलवाडी या सुक्षेत्री वै.हभप सद्गुरु बाळाराम महाराज धाडवे यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हभप जनार्दन महाराज धाडवे यांचे मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व नाशिक येथील महंत हभप कालिकानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगीत श्री राम कथा शनिवारी 13 एप्रिल ते शनिवार 20 एप्रिल पर्यंत 8 दिवस ज्ञानदानाचे आयोजन करण्यात आले आहे त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
या ज्ञानयज्ञात प्रवचने, कीर्तने, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा श्रवण करण्याचे भाग्य लाभणार असून ज्ञान प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रातील सांप्रदायनिष्ठ नामवंत संतजनमंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे श्रवण सुखाचा लाभ घेऊन आपण आपले जीवन कृतार्थ करावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळ विठ्ठलवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.
गुरुवर्य हभप जनार्दन महाराज धाडवे व हभप अनंत महाराज धाडवे यांचे शुभहस्ते कलश स्थापन व विणापूजन होणार असून पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी साडेसहा ते साडेसात वाजता विठ्ठल रखुमाई अभिषेक, सकाळी साडेसात वाजता ग्रंथ दिंडी, सकाळी आठ ते बारा श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी दोन ते तीन नित्य हरिपाठ, दुपारी तीन ते पाच संगीत श्रीराम कथा, सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन तसेच रात्री दहा नंतर हरिजागर यावेळी संपन्न होणार आहे.
कीर्तनकार गुरुवर्य हभप जनार्दन महाराज धाडवे, पंढरपूर येथील गुरुवर्य हभप विठ्ठल महाराज वासकर, तळवली येथील हभप मारुती महाराज कोल्हटकर, वलंग येथील हभप गणेश महाराज चव्हाण यांच्याहस्ते संतपूजन, चिपळूण येथील हभप रुपेश महाराज राजेशिर्के, माणगाव येथील हभप बाळाराम महाराज मुरकर, माणगाव येथील हभप नरेश महाराज मुरकर, आळंदी येथील हभप तुकाराम महाराज शिंदे, ठाणे येथील हभप यशवंत महाराज पाटील तसेच काल्याचे कीर्तन अप्पर तुडील येथील सिताराम महाराज कुंभार, हरीजागरसाठी आदिस्ते सुतारकोंड ग्रामस्थ मंडळ, आदिस्ते मुळगाव ग्रामस्थ मंडळ, बेबळघर ग्रामस्थ मंडळ, सोनघर ग्रामस्थ मंडळ, अप्पर तुडील ग्रामस्थ मंडळ, जुई ग्रामस्थ मंडळ, चिंभावे सुतारकोंड ग्रामस्थ मंडळ त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा, महिलांचे हळदीकुंकू व म्हाप्रळ बंदरवाडी, रोहन, विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ यांचा हरीजागर होणारा आहे.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ विठ्ठलवाडी, महिला मंडळ, श्री हनुमान स्पोर्ट्स क्लब व संतसेवा मंडळ विठ्ठलवाडी पंचक्रोशी, मुंबई कमिटी अध्यक्ष संदीप पारधी, कार्याध्यक्ष शिवराम दोरकर, सरचिटणीस मितेश नवले, खजिनदार सुनील बोरकर व गाव कमिटी अध्यक्ष हभप मंगेश धाडवे, सचिव संजय मांडवकर, खजिनदार राजेश बर्वे यांनी केले आहे.
Be First to Comment