बहिरीनाथ मंदिरासाठी महेंद्रशेठ घरत यांनी दिले एक लाख रुपये !
सिटी बेल ∆ उलवे ∆
नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत एका वर्षात जवळजवळ 60 मंदिरांना आर्थिक मदत केली आहे. सकाळी त्यांच्या जनता दरबारात अपेक्षेनी आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाती जात नाही हे विशेष. आपल्या कमाईतील काही हिस्सा ते समाजकार्यासाठी सढळ हस्ते देत असतात.
बेलपाडा येथील बहिरीनाथ मंदिरासाठी त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश आज सुपूर्द केला. गोरगरीब व देवासाठी खर्च केल्याच्या दहापट परमेश्वर आपल्याला देतो असा त्यांचा विश्वास आहे.आपल्या दारातून कोणीही दुःखी किंवा रिकाम्या हाती जाऊ नये असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.








Be First to Comment