सुवर्ण क्षणी, अमृत योगाचे वेळी होणार कळंबोली येथील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा
सिटी बेल ∆ कळंबोली ∆
कळंबोली येथल्या सेक्टर १ मधील श्री राम मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचे दिवशी प्रभू रामचंद्र यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजित कार्यक्रमांच्या अनुषंगाने अगदी तसेच कार्यक्रम कळंबोली येथील श्री राम मंदिरामध्ये पार पडणार आहेत. तीन दशकांहून अधिक कालावधी पूर्वीचे या मंदिरामध्ये अत्यंत मनमोहक आणि नेत्र दीपक असे बांधकाम करण्यात आलेले आहे. या मंदिर निर्मितीची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आज त्यांची दुसरी पिढी जिर्णोद्धार प्रक्रियेसाठी सक्रिय झाल्याचे अत्यंत समाधानकारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळते.
आमच्या प्रतिनिधीने या जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पिढीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
यावेळी अध्यक्ष संतोष नामदेव मोकल,उपाध्यक्ष सचिन उत्तमराव देशमुख,खजिनदार सुशांत सखाराम कापरे,
उप खजिनदार सुरज अशोक रजपूत,सेक्रेटरी महादेव दादासाहेब क्षीरसागर,
उप सेक्रेटरी अनिल जयसिंग रजपूत, हिशोब तपासणीस मयुर अशोक रजपूत,संतोष देशमुख,
तसेच मंदिर निर्माण झाल्यापासून सक्रिय असणारे यशवंत पाटील,किसन पिसाळ हे ज्येष्ठ सभासद उपस्थित होते.त्यांनी मंदिर निर्मितीचा इतिहास सादर केला.तसेच मंदिर निर्माण करण्यासाठी सढळ हस्ते मदत करणारे शेकाप चे ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख प्रभुदास भोईर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
कैलासवासी नामदेव मोकल, कैलासवासी उत्तमराव देशमुख, कैलासवासी बिरा जनक राऊत यांची दुसरी पिढी मंदिर जीर्णोद्धारासाठी अथक परिश्रम घेत आहे.
चला तर मग पाहूयात काय म्हणालेत मंदिर नव्याने निर्माण करणारे कार्यकर्ते.
Be First to Comment