Press "Enter" to skip to content

उदयोजक डॉ संजय सोनावणे यांच्या कडून श्रामणेर शिबिरास भोजनदान

सिटी बेल ∆ पनवेल ∆

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने २४ वे श्रामणेर बौद्धाचार्य धम्मप्रशिक्षण शिबीर रसायनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये १७ जानेवारी ते २६ जानेवारी असे दहा दिवसीय आयोजित केले आहे या शिबिरास उद्योजक तथा पनवेल तालुका पत्रकार विकास मंच चे सल्लागार डॉ. संजय सोनावणे यांच्या कडून भोजन दान आज करण्यात आले .

या शिबिरास भोजन दान दिल्याने डॉ संजय सोनावणे यांचे भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र मोरे यांनी आभार व्यक्त करताना डॉ संजय सोनावणे हे नेहमीच दम्मदान करीत असतात हे हि सांगितले . डॉ संजय सोनावणे यांचे बंधू निलेश सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे भोजनदान आज देण्यात आले .या श्रामणेर शिबिराला पूजनीय संघचालक भन्ते थेरो महेंद्र बोधी हे उत्तम धम्म प्रचारक घडवण्याचे काम करीत आहेत .त्यांच्या मार्गदर्शन या शिबिराला लाभले आहे असे हि मोरे यांनी या वेळी सांगितले .

या शिबिरास रायगड महासचिव संजय जाधव ,रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ कांबळे , उपाध्यक्ष स. जा .कवडे ,पनवेल तालुका अध्यक्ष सुनील वाघपंजे ,महासचिव राहुल गायकवाड ,रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , खालापूर तालुका अध्यक्ष विनायक गायकवाड ,महासचिव भानुदास गायकवाड , खोपोली शहराध्यक्ष आनंद सोनावणे , संस्कार प्रमुख के के गाढे , आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.