Press "Enter" to skip to content

खीडुकपाडा जाहली दत्त नगरी

प्रभुदास भोईर यांच्या वाहतूक सेलची भरभराट होत राहो
– भाई जयंत पाटील

सिटी बेल ∆ खिडूकपाडा ∆

शेकाप वाहतूक सेल चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांची व त्यांच्या वाहतूक सेलची भरभराट होत राहो असे शुभाशिर्वाद सरचिटणीस जयंत भाई पाटील यांनी येथील खीडुकपाडा दत्तजयंती निमित्त आयोजित सोहळ्यात काढले.ग्रामस्थ मंडळ खीडुकपाडा,टीम अण्णा आणि प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित दत्त जयंती सोहळ्याचे यंदाचे २० वं वर्ष होते.सकाळपासून रात्रीपर्यंत दत्तदर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.

राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, साहित्यिक,क्रीडा,वैद्यकीय,न्याय व विधी,प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी याठिकाणी अवतरली होती. प्रभुदास भोईर स्वतः जातीने आलेल्या प्रत्येकाला शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत होते.

प्रातःसमयी श्री दत्तगरु यांच्यावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर होम हवन करण्यात आले.श्री सत्यनारायण पूजन संपन झाले.महाआरती झाल्यावर महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला.विशेष म्हणजे यावेळी येणाऱ्या भक्तांसाठी विनामुल्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये मधुमेह चाचणी,रक्तदाब तपासणी, श्रवण क्षमता, ई सी जी, कन्सल्टेशन,औषधे हे सर्व विनामूल्य देण्यात येत होते.अन्य कुठल्याही वैद्यकीय शिबिरामध्ये न दिसणाऱ्या सोयी सुविधा येथे रुग्णांना प्रदान करण्यात येत होत्या. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या श्रवण दोषांवर उपचार करण्यासाठी श्रवण क्षमता मापन यंत्रणा देखील याठिकाणी कार्यान्वित करण्यात आली होती.

संध्याकाळी पंचक्रोशीतील नागरिकांना कुर् सुप्रसिद्ध या मराठी नाटकाचा प्रयोग दाखवण्त आला. नाट्यप्रयोगापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे आणि विशाखा सुभेदार यांनी प्रभुदास भोईर करत असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे प्रशांतचा केली तसेच या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल प्रभुदास भोईर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नाट्यप्रयोग दाखवण्यात आला तो नाट्यप्रयोग पंढरीनाथ कांबळे आणि निर्मिती सावंत यांचा अभिनय असलेली गंगुबाई नॉनमॅट्रिक ही नाट्यकृती या ठिकाणी सादर केल्याची आठवण पंढरीनाथ कांबळे यांनी जागवली.

शेकाप सरचिटणीस जयंत भाई पाटील, सुप्रियाताई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, गुलाबराव जगताप, जे एम म्हात्रे,चित्रलेखा पाटील एडवोकेट आस्वाद पाटील चित्राताई पाटील, शेकापचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण शेठ घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना उबाठा गटाचे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष शिरीष घरत,माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, पंचायत समिती पाटणचे उपसभापती डी आर पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नवीन भाई गवळी, माजी उप महापौर जगदीश गायकवाड आदी मान्यवरांच्या सह अनेक प्रतिष्ठित,प्रशासकीय अधिकारी,पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,ग्रामस्थ मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यू ट्यूब लाइव्ह च्या माध्यमातून लाखो भाविकांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.