सिटी बेल ∆ आवरे ∆ साईनाथ पाटील ∆
आवरे येथील सोमा रामा गावंड कुटुंबातील स्त्री सदस्या व धार्मिक प्रथा जतन करणाऱ्या आवरे गावातील शे. का. प चे जेष्ट कार्यकर्ते स्वर्गीय नामदेव सोमा गावंड यांच्या पत्नी इंदुबाई नामदेव गावंड यांचे शनिवार दिनांक 24/6/2023रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
सौजन्यशील असणाऱ्या इंदुबाई या अतिशय नम्र व विनयशील अश्या स्वभावाच्या होत्या. जनमानसात त्या मिळुन मिसळून असायच्या त्यांच्या जाण्याने गावंड कुटुंबातील सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक शक्ती देवो त्यांच्या पश्चात दोन मुली , जावई मुले सुना , व नातवंडे असा सहपरिवार आहे बुधवार दिनांक 5/7/2023 रोजी त्यांचे दशविधि कार्यक्रम उत्तर कार्य हे एकाच दिवशी राहत्या घरी करण्यात येणार आहे.
कुटुंबातील सदस्यांनी सर्वाना एक विनंती केली आहे की, दुःखद प्रसंगी घरी येताना कोणत्याही प्रकारचा दुखवटा आणू नये.
Be First to Comment