Press "Enter" to skip to content

प्रगतशील शेतकरी चंद्रकांत हाबळे यांचे निधन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत आबाजी हाबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्जत तालुक्यातील बेकरे येथिल चंद्रकांत आंबो हाबळे हे भजनी कलावंत होते तसेच त्यांनी सुमारे 35 वर्ष मध्य रेल्वे मध्ये त्यांनी सेवा केली.तसेच कर्जत तालुक्यांतील निळ्या भाताची शेती करीत असल्याने प्रगत शेतकरी म्हणुन अशीही त्यांची ओळख निर्माण केली होती.10ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांना राहत्या घरी बेकरे येथे हृदयविकराचा झटका आला. त्यांनतर त्यांना तात्काळ रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना कल्याण रेल्वे रुग्णालयात आणि नंतर उल्हास नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दीड दिवस उपचार घेवून देखील चंद्रकांत हाबळे यांची प्राणज्योत मालवली.

चंद्रकांत आबाजी हाबळे यांचा पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र जयवंत हे एका मोठ्या वृत्तपत्रात उप संपादक आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.