कविश्री- अरुण द. म्हात्रे. यांची डॉक्टरांच्या सेवेबाबत स्वरचित कविता- “जीवन दाते डॉक्टर”
जीवनदाते डॉक्टर
डॉक्टर तुम्ही व्याधींचे नाशक
कार्य-कौशल्य तुमचे महान
रुग्ण-नातेवाईक सारे मानती
तुम्हाला परमेश्वर-देवासमान…1.
निर्णय-शक्ती तुमची दांडगी
प्रयत्न पराकाष्ठेचे करता
रोग-आजार हटवूनी-मिटवूनी
रुग्णांना जीवन-दान देता… 2.
भक्तास ‘देवमुख’ दिसताच तो
सगळी दुःख विसरून जातो
रुग्णांना तुमचा हात लागताच
त्याच्या ‘जीवात-जीव’ येतो… 3.
रुग्ण-नातेवाईकांना समजून सांगावे
चिंताग्रस्त ते त्रासले-घाबरलेले
रुग्ण-नातेवाईकांनीही समजून वागावे
डॉक्टर-स्टाफ असती भले-चांगले… 4.
माणूस धर्माहुनी नसे धर्म मोठा
तुमच्या कर्तव्यात आहे भरलेला
डॉक्टरी पेशाने निष्णात तुम्ही
नमस्कार अनं धन्यवाद तुम्हाला… 5.
कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई मो.- 9987992519.
Be First to Comment