कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता… जय हनुमान !!
|| जय हनुमान ||
अंजनीसुत पवनपुत्र तू हनुमान
उचललास पर्वत तळहातावर
अपार श्रद्धाभक्ती प्रभू रामावर
तव शक्ती-भक्तीचा महिमा थोर…
बालपणी धाडस सूर्य धरण्याचे
उदाहरण अजोड तव धाडसाचे
आशिष डोईवर प्रभू रामचंद्राचे
माया-प्रेम लाभले सीता माईचे…
रावणाच्या लंकेत पोहोचण्यास
दगडांचा सेतू बांधिला सागरात
शेपटीने लंका जाळली क्रोधात
यशस्वी सितामाईस आणण्यात…
हनुमंतासम लाभो शक्ती तनास
अन्याय – अत्याचार संपविण्यां
हनुमंतासम लाभो भक्ती मनास
सद्भावना – श्रद्धा जागविण्यां !!
©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment