लहानपणापासून ज्ञानप्राप्त कसे-कसे होत असते. तसेच सुसंस्कार किती महत्त्वाचे असतात ? पाहूयात कविश्री- अरुण द. म्हात्रे यांच्या “ज्ञानार्जन” कवितेतून….
|| ज्ञानार्जन ||
शिक्षक देत असतात शिक्षण
करावा आदर, राखावा मान
लिहिण्या-वाचण्या ते शिकवती
शिकताना ठेवावे एकाग्र ध्यान…
टाकीचे घाव सोसल्या शिवाय
दगडालाही देवपण येत नाही
छडी छम-छम लागल्या शिवाय
विद्याही घम-घम येत नाही….
शिक्षक शिकवती विद्या-मंदिरी
आईबाबा, वडीलधारी घरात
अनुभव शिकवतात समाजात
अशाप्रकारे ज्ञान, होतसे प्राप्त…
ज्ञानाने स…दुर पळते अज्ञान
साक्षरता करी मानवा सुजाण
सु-संस्कार, शिक्षण द्यावे-घ्यावे
सत्कृत्यांनी वाढते मानसन्मान !!
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई, मो. 9987992519.
Be First to Comment