Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

कविता = पोस्टमन काका

आलीय का काही पत्र-चिट्ठी ?
प्रेमाने मारत होतो ज्याना हाका
ख्याली-खुशाली चे पत्र-चिट्ठी
आणत होते पोस्टमन काका…१.

ठीक ठिकाणी लांब अंतरावर
पायी किंवा सायकलने जायचे
ऊन असो वा पाऊस – पाणी
नियमित ‘ड्युटी’ ते करायचे…२.

नव्हते जेव्हा फोन – मोबाईल
संदेश तात्काळ नव्हते मिळत
दूर गेलेल्या व्यक्तीच्या पत्राची
आतुरतेने वाट पाहत बसत….३.

पोस्टकार्ड, आंतर्देशिय पत्रावर
मनीच्या ‘भावना’ व्हायच्या व्यक्त
संदेश देणारे पोस्टमन काका
एक प्रकारचे आपले होते मित्र…४.

©® कविश्री. अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.