Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

प्रकल्पग्रस्त/भूमिपुत्रांनी शासनाला/अधिकाऱ्यांना द्यावयाचे निवेदन. पाहूयात कविश्री- अरुण द. म्हात्रे यांच्या “निवेदन पत्र भूमिपुत्रांचे !” या कवितेतून…

निवेदन पत्र… भूमिपुत्रांचे !

भू-धारक मूळचे आम्ही, आम्हीच भूमिपुत्र
न्यायी- हक्क मागण्यांचे, देतो निवेदन- पत्र..||

नको मतभेद भांडणे, मोर्चे – आंदोलने
शासनकर्ते-अधिकाऱ्यांनो, वागा माणुसकीने
वाईटाला समजाऊनी, बनतो चांगल्यांचे मित्र-
न्यायी- हक्क मागण्यांचे, देतो निवेदन- पत्र…१.

विकासाच्या कामांसाठी, नाही नकार आमचा
सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या, हट्ट आहे आमचा
घाम गाळुनी शेतात, राबलोत ऊन-पावसात-
न्यायी- हक्क मागण्यांचे, देतो निवेदन- पत्र…२.

नको थारा परकीयांना, नको त्या लोंढ्यांना
व्यवसाय-धंद्याचे परवाने, द्यावे स्थानिकांना
नोकरीत प्राधान्यासह, ठरवावे आम्हाला पात्र-
न्यायी- हक्क मागण्यांचे, देतो निवेदन- पत्र…३.

गावठाण क्षेत्रे विस्तारित, विकसित करावी
बांधलेली घरे-सदने कायमस्वरूपी व्हावी
सलोख्याच्या धोरणाने, सारे प्रश्न सुटतात-
न्यायी- हक्क मागण्यांचे, देतो निवेदन- पत्र…४.

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे, जासई-उरण-रायगड मो.- 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.