सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत 40 प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून 40 प्लसचे सदस्य हा उपक्रम ‘एक धाव आरोग्यासाठी व पुन्हा एकदा तारुण्याकडे’ या ब्रीद वाक्याला अनुसरून करीत आहेत. त्यातील काही सदस्य सत्तरीकडे झुकत आहेत तरी सुद्धा त्यांचा उत्साह एकविशीतल्या खेळाडूला लाजवेल असा आहे. विशेष म्हणजे राजकारण आणि जाती धर्म बाजूला ठेऊन हे सदस्य हा उपक्रम राबवित आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर क्रिकेट हंगामाच्या मुहूर्तावर शुभारंभ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रणजित जैन, नगरसेवक संकेत भासे, माजी नगरसेवक प्रविण गांगल, शिरीष दिघे, महेंद्र निगुडकर, विकास चित्ते, प्रकाश गायकवाड, राजू ओसवाल अध्यक्ष शशांक शेट्टी, उपाध्यक्ष विनायक परांजपे, कार्याध्यक्ष दिनेश कडू, कोषाध्यक्ष दिलीप जाधव, सह सचिव जयवंत पिंगळे आदी उपस्थित होते. ‘गेली 15 वर्षापासुन हे सदस्य संघर्षमय जीवनाच्या प्रापंचिक जबाबदार्या सांभाळून आपल्या आरोग्यासाठी दर रविवारी क्रिकेट खेळाचा आनंद घेत असतात. आपल्या 40 प्लस क्रिकेटच्या या ब्रीदवाक्य प्रमाणे आनंदाचे व समाधानाचे क्षण क्रिकेट च्या मैदानात अनुभवत आहोत, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असताना निखळ मैत्री जपत जीवनाचा आनंद घेत आहेत.’
याप्रसंगी सचिन मनोरे, विराग फाटक, गिरीश सुर्वे, किरण देशमुख, संदीप देशमुख, मंगेश म्हसे, समीर चव्हाण, किशोर देशमुख, जगदीश पालकर, जगदीश देशमुख, जितेंद्र देशमुख, रमेश पवार, सुरेश गायकर, अमित भिषीकर, निशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
Be First to Comment