Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांची फटकेबाजी

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीनियर क्रिकेट टीम च्या नवीन हंगामाची सुरुवात

सिटी बेल ∆ पनवेल ∆

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीनियर क्रिकेट टीम च्या नवीन हंगामाची सुरुवात पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून व चौफेर फटकेबाजी मारून केले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिनिअर क्रिकेट टीम ला पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या हस्ते सर्व टीमच्या सभासदांना टोपी चे वाटप करण्यात आले.

यावेळी उद्योगपती संजय पाटकर व माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे स्वागत डॉक्टर ययाती गांधी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर नितीन पोवळे यांनी केले.

यावेळी कर्णधार राजेंद्र पाटील व उपकर्णधार कुणाल सावंत, खजिनदार त्रिशूल म्हात्रे, मार्गदर्शक ॲड. चंद्रशेखर वाडकर, प्रफुल पेंडसे, भाई सुभाष पाटील, नितीन पाटील, प्रमोद पाटील, बाळू देशमुख, विजय पाटील, सागर आटवणे, डॉक्टर रवींद्र राऊत, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर मिलिंद जोशी, डॉक्टर आशिष गांधी, माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन, गोपाळ भोईर, अप्पू कुंभार, राजेश शेट्टीया, अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.