Press "Enter" to skip to content

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..!

जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नवी मुंबई मनपा शाळा क. ३६, कोपरखैरणे गाव ने पटकावले स्पर्धेचे सर्व साधारण विजेतेपद

सिटी बेल ∆ क्रीडा प्रतीनिधी ∆

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्ष तायक्वांदो खेळात वर्चस्व गाजवणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क.३६, कोपरखैरणे गाव या शाळेने याही वर्षी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर या क्षेत्रातला आपला दबदबा कायम ठेवला आहे.

दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी वारकरी भवन, सेक्टर ३, राजीव गंधी स्टेडीयम जवळ, सीबीडी, बेळापूर येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरिय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४ मध्ये शाळेतील मुलां-मुलींनी आपल्या वेगवान व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेत ११ सुवर्ण, १३ रौप्य व १६ कास्य अशी एकूण ४० पदके पटकावून या स्पर्धेत सलग दुस-यांदा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंच्या व संघाच्या यशामध्ये श्री. सुभाष पाटील सर (तायक्वांदो मुख्य कोच नवी मुंबई मनपा), श्री. दिनेश भोपी सर (तायक्वांदो कोच), श्रीम. सिमा भोपी मॅडम (तायक्वांदो कोच), श्री. प्रशांत गाडेकर सर (संघ व्यवस्थापक), श्रीम. वर्षा शिंदे मॅडम (संघ व्यवस्थापक), श्री. बानेश्वर घुगे सर, श्री. दत्तात्रय गागरे सर, श्रीम. नयना गटकळ मॅडम. पंकज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या स्पर्धेतील विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

सुवर्ण पदक : देवयानी हिरवे, श्रेया विजय शेलार, शेजल दत्तात्रय कंक. आयुष सुरेश लिघांटे, आर्यन रमेश दिंडे, निकिता संतोष राठोड, काजल विष्णु ढाकरगे, वैभव कैलास गुंजाळकर, स्वरा बंडोपंत कांबळे, नंदिनी अरुण चव्हाण, आर्यन संजय निकम.

रौप्य पदक : जानवी भारती,
आदिती संजय खधुले, श्रावणी सुभाष उबाळे, श्रध्दा अंकुश खाटपे, दुर्वा अनिल वांगडे, सिमा विजय राठोड,
श्रावणी विजय शेलार, करिश्मा विश्वनाथ चव्हाण, खुशी राकेश विश्वकर्मा, जयश्री उमेश जाधव, दिलशान दिपक भालेराव.

कास्य पदक : चैत्रा मल्लप्पा इजेरी, ममता सतिश मोहिते, साक्षी गजानन राऊत, सारिका राधाकिसन अंभोरे, सानिका महादेव हिरवे, मनिषा गजानन राऊत, समृध्दी भिमराव पाटील, चैताली तानाजी मांढरे, पुनम विलास पवार, आकाश नामदेव यमकर, अरविंद विजय पत्तार, अक्षय शिवाजी ढवळे, अदित्य महादेव हिरवे, अथर्व प्रशाद कांगणे, मानव अशोक मुलगे, बुध्दम शक्ती सरावे.

या यशाबद्दल शाळेच्या खेळाडूंचे व वरील सर्व मार्गदर्शक व सहकार्य करणा-यांचे मा. श्रीम. ललीता बाबर मॅडम (उपायुक्त नवी मुंबई मनपा), मा. श्रीम. अरुणा यादव मॅडम (शिक्षणाधिकारी नवी मुंबई मनपा), मा. श्री. रेवप्पा गुरव सर (जिल्हा कीडा अधिकारी नवी मुंबई मनपा), मा. श्रीम. सुलभा खारघरे मॅडम विस्तार अधिकारी नवी मुंबई मनपा), मा. श्री. शिवराम पाटील साहेब (नगरसेवक नवी मुंबई मनपा), मा. श्रीम. दिपाली संखे मॅडम (मुख्याधिपीका मनपा शाळा क.३६) यांनी विषेश कौतुक व अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व शाळेतील इतर कर्मचारी यांच्या कडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.