Press "Enter" to skip to content

मुलींमध्ये कर्जत तालुक्याची बाजी

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा संपन्न

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

वेटलिफ्टिंग असोसिएशन रायगड च्या वतीने अश्वमेध वेटलिफ्टिंग क्लब, ठाणे व संजय हेगडे स्पोर्ट्स अकॅडमी, कर्जत यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे साठी पाच तालुक्यातून सुमारे पन्नास खेळाडू आले होते. त्यामध्ये सर्वात अव्वल ठरल्या त्या कर्जत तालुक्यातील मुली.

अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी प्रसाद थोरवे, अक्षय शितोळे, सिद्धेश थोरवे, प्रतीक हेगडे, स्नेहा हेगडे, सिद्धार्थ शिंदे, नवनाथ दाभाडे, संजय देशमुख, दीपक चौरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून सलोनी मोरे व बबन झोरे होते.

निकाल

युथ मुले
49 किलो गट – प्रथम – सय्यद साळवी ( महाड ), द्वितीय – संकेत मोरे ( कर्जत ), तृतीय – अनिरुद्ध देशक ( कर्जत )
55 किलो गट – प्रथम – रोशन चव्हाण ( महाड )
61 किलो गट – प्रथम – साईनाथ खतरावत ( कर्जत ), 67 किलो गट – प्रथम – सय्यद धोत्रे ( महाड )
ज्युनियर मुले
55 किलो गट – प्रथम – सार्थक शिंदे ( खोपोली ) द्वितीय लोकेश श्रुंगारपुरे ( कर्जत ) 67 किलो गट – प्रथम – विनीत गुप्ता ( खोपोली ), 73 किलो गट – प्रथम – यश गायकवाड ( कर्जत ) 81 किलो गट – प्रथम – सोहम राजवाडे ( महाड ), द्वितीय – विशाल पुजारी ( खोपोली ), 89 किलो गट – प्रथम – हरिहरण नाडर ( खोपोली ),
सिनियर मुले
55 किलो गट – प्रथम – हरेश थळे ( खोपोली ), 61 किलो गट – प्रथम – यश मोरे ( महाड ), 81 किलो गट – प्रथम – प्रथमेश केवणे ( कर्जत ), द्वितीय – अजिंक्य भगत (खोपोली )
युथ मुली
40 किलो गट – प्रथम – नुपूर गवळी ( कर्जत ), द्वितीय – आचल भारद्वाज ( कर्जत ), 45 किलो गट – प्रथम – गायत्री बडेकर ( कर्जत ), 49 किलो गट – प्रथम – तेजश्री ढोले ( कर्जत ) 55 किलो गट – प्रथम – आर्या शिंदे ( कर्जत )
ज्युनियर मुली
45 किलो गट – प्रथम – यशोदा राठोड ( कर्जत ), 55 किलो गट – प्रथम – दीपाली घाग ( महाड ), द्वितीय – हर्षला गोळे ( कर्जत ), 59 किलो गट – प्रथम – अंजली येवले ( कर्जत ),
64 किलो गट – प्रथम – भूमिका फुलपगारे ( कर्जत ), 76 किलो गट – प्रथम – सिद्धी माने ( पनवेल )
सिनियर महिला
45 किलो गट – प्रथम – तय्यबा मुजावर ( कर्जत )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.