Press "Enter" to skip to content

घवघवीत यशाला गवसणी घालत राष्ट्रीय स्पर्धेत मारली धडक

राज्यपातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेत अभिजित पाटील चमकले

सिटी बेल ∆ क्रिडा प्रतिनिधी ∆

अभिजित पांडुरंग पाटील यांच्या रायफल शुटींग करियरचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. गुजरात येथे झालेल्या राज्यपातळीवरील स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत अभिजित पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेत धडक मारली.पुणे येथील बालेवाडी मध्ये जुलै अखेरीस झालेल्या स्पर्धेत ५० मिटर रायफल प्रोन पोझिशन खेळ प्रकारातील पुरुष गटात अव्वल येत अभिजित पाटील यांनी गुजरात येथील स्पर्धेत मानाचे स्थान पटकावले होते.राष्ट्रीय पातळीवरील शूटिंग स्पर्धेत निवड झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रथितयश उद्योगपती,सजग राजकारणी,सेंट्रल रेल्वेच्या झोनल कमिटीचे सन्माननीय सदस्य, ऍनिमल वेल्फेअर असो. च्या माध्यमातून प्राणिसेवा देणारे, अष्टावधानी गुणवैशिष्ठये असलेले अभिजित पाटील रायफल शूटिंग ची आवड, छंद या संकल्पनेच्या पलीकडे जात एक पॅशन म्हणून जपतात.

मागच्या महिन्यात महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर अँड फायर आर्म कॉम्पिटिशन मध्ये ६०० पैकी ५७७ गुण मिळवत अभिजित पाटील अव्वल ठरले होते. त्यामुळेच त्यांची गुजराथ येथील राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेतदेखील घवघवीत यश मिळविल्याबद्दल अभिजित पाटील यांना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ने प्रशस्ती पत्र बहाल केले आहे. १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान गुजरात येथे या स्पर्धा रंगत आहेत. तसेच आगामी काळात केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी अभिजित पाटील यांची निवड झाली आहे.

आंतरराज्य,राज्यपातळी आणि थेट राष्ट्रीय पातळीवर धडक मारणाऱ्या अभिजित पाटील यांचा खेळाडू म्हणून प्रवास थक्क करायला लावणारा आहे. गुजराथ येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजराथ,दीव दमण,मध्य प्रदेश येथून शेकडो शूटिंग खेळाडूंच्या समवेत खेळताना अभिजित पाटील यांनी दैदिप्यमान शूटिंग स्किल्स सादर करत यशाला गवसणी घातली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.