नागावमधील रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी पुन्हा बहरणार : हाॅटेल, काॅटेज मालकांची तयारी सुरू 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशील सावंत 🔶🔶🔷🔷
कोरोनाच्या पाश्वभूमीवर खबरदारी म्हणून पर्यटन बंदी घालण्यात आली होती. अलिबाग येथील 7 महिने पर्यटन बंद होते, पण आता सात महिन्यानंतर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटन खुले होणार असल्याने पर्यटकांसह व्यापारी, व्यवसायिक, कॉटेज मालक सुखवल्याचे दिसत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे मार्चपासून सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली होती. यात रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पर्यटनही बंद होते. पण आता सात महिन्यानंतर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटन खुले करण्यात येत आहे. नागाव ग्रामपंचायतीने पर्यटन खुले करण्यास परवानगी दिली आहे. कॉटेज व्यवसायिकांनीही पर्यटन सुरू होत असल्याने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागावमधील रस्ते, समुद्र किनारे पर्यटकांनी बहरण्यास सुरूवात होणार आहेत.पर्यटकाची बुकिंगही येण्यास सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळून ग्राहकांना सुविधा पुरविणार आहेत.
Be First to Comment