कामगार नेते महेंद्र घरत यांनी घडविले घरत परीवारातील ६० लेकी सुना व बाळगोपाळांना हेलिकॉप्टरने वैष्णोदेवी मातेचे दर्शन व काश्मीर ची सहल
सिटी बेल । जम्मू काश्मिर । स्पेशल रिपोर्ट ।
साक्षात वैष्णोदेवी मातेचे दर्शन चैत्र नवमीला अतिशय सुदंर फुलांची आरास, मातेच्या गाभान्यात अतिशय डोळयांचे पारणे फेडणारे दृश्य. लॉकडाऊनमुळे भाविकांची गर्दी कमी तरी, घरत परीवारातील ६० लेकी सुना बाळगोपाळांना १२ कि.मी चा खडतर प्रवास नको म्हणून सर्वांना हेलिकॉप्टरने दर्शन घडविण्याचा कुंटुंब प्रमुख महेंद्र घरतांचा मानस आणि माता वैष्णोदेवीचा बुलावा.
एवढ्या मोठ्या ग्रुपला अगदी शेवटच्या रात्रीपर्यंत हेलिकॉप्टर मिळणे दुरापास्त आहे असे वाटत असताना, सकाळी १४ एप्रिलच्या भल्या पहाटे माता दी चे नामस्मरण करून हेलिकॉप्टरच्या रांगेत सर्व लेकी सुना आपल्या बाळगोपाळांसह उभ्या ठाकल्या आणि मातेच्या अनुभुतीचा खऱ्या अर्थाने प्रत्यंतर आले. सर्व ६० जणांना हेलिकॉप्टर तिकीट मिळाले. मॉ. वैष्णोदेवी सह – भैरवनाथ भोलेनाथ गुफेवर सर्वांना अतिशय चैत्रोनवमीच्या प्रसन्न वातावरणात सुंदर फुलांच्या आरासीसह दर्शन झालं. जय माता दी.
सातत्याने गोरगरीब पददलितांना, कामगारांना मदत करून सर्वांना आनंद आणि समाधान देण्यासाठी कटिबध्द असलेले महेंद्रजी घरत यांनी आपल्या मोठया कुंटुंबातील लेकी-सुनांना विमानाने फिरवून आणण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासने अनेक जण देतात परंतु पुर्तना करणारे आजच्या कलियुगात हाताच्या बोटावर मोजण्यापर्यंतच “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे महेंद्रजी घरत यांनी सांगितले, नियोजन केले केवळ विमान प्रवास नाही तर जगातील सर्वोत्तम स्वर्ग – काश्मिरच दर्शन, माँ वैष्णोदेवी दर्शनासह घडविण्याचा निश्चय केला. पाच पंचवीस नाही तर परिवार मोठा असल्यामुळे तब्बल ६१ जणांची नोंदणी झाली. मुळांत घरत परिवार नहेंद्र घरत साहेबांचे ८ काका, १ आत्या आणि ३ भाऊ, चुलत भाऊ १३, चुलत बहिणी १५ सुना – बहिनी त्यामुळे संख्या वाढली.
त्यातच लॉकडाऊन दिवसें दिवस भयंवर होणारी परिस्थिती परंतु महेंद्रजी घरत सांगतात, हेतु शुद्ध असेल आणि देवाची साथ असेल तर काहीही अशक्य नाही स्वताचे घर, दोन्ही मुलांची लग्ने कोविडच्या काळाता थाटामाटात न भुतो ना भविष्यते अशा प्रकारे गजाननाचे आर्शिवादाने पार पाडली, त्यामुळे अशक्य शब्द महेंद्रजी घरतांना माहीत नाही. आणि अशा प्रकारे वैष्णोदेवीच्या साग्रसंगीत दर्शनाने तृप्त झालेल्या लेकी – सुनांचा जथ्या विमानाने जम्मूहून श्रीनगर स्वर्गाच्या प्रवेश द्वारात पोहचला. पुढे अमरनाथ यात्रेचे प्रवेशद्वार अतिशय निसर्गाच्या समृध्दी नटलेल्या पढेलगाम येथे पोहोचला बेताब व्हॅलीपाहून सुंदर नदीच्या तीरावर काश्मिरी पेहेरावामचे फोटे सेशनामध्ये सर्व रमल्या. पुढे स्नोफॉल (बर्फवारी) होत असलेल्या गुलमर्ग मध्ये बर्फावर आरूढ होण्याचा आनंद मनसोक्त उपभोगनाता उणे २ अंश चा ही फरक लेकी – सुनांना जाणवला नाही.
लेकी – सुनांच्या नशीबाने श्रीनगर वास्तव्यामध्ये अल्पकाळासाठी बहरलेली सुंदर टुलीप गार्डन मध्ये रमून फोटोशेसन पुढे मुघल गार्डन, शकरायाचे मंदिर आणी शिकारामध्ये बसून प्लोटिंग मार्केट आणि शिका-यानवून विविध वस्तूंची मनसोक्त काश्मिरी शाल, कावा अनेक आर्टिफिशियाल दागिन्यांची शिकारामधून खरेदी तसेच शिकाऱ्यामध्ये काश्मिरी युवतींच्या विविध रंगी काश्मिरी ड्रेसेमध्ये केलेले फोटोशेसन र्सवच अविस्मरणीय असे वाटत होते. हा प्रवास संपूच नये त्यातच परतीच्या प्रवासाचे स्पाइसजेट विमान श्रीनगर मुंबई रदद झालेले.
परंतु या सर्व प्रवासाचे नियोजक करणारे टूर लिडर पेरुमल यांनाच साहेबांनी बरोबर घेतले होते, त्यामुळे तातडीने सर्वांच्या परतीच्या प्रवासाची तिकिटे श्रीनगर मुंबई इंडिगो एअरलाईन्समधे व्यवस्था करून घेतली आणि लेकी सुनांचा किलबिलाटासह सोमवारच्या सायंकाळी सुखरूप श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतल टर्मिनल २ वर अवतरले आणि अशा प्रकारे घरत परिवाराचा लेकी – सुनांचा स्वप्नवत अशा मिशन काश्मिर प्रवासाचा सुखद परतावा झाला परंतू अनेक जणी पहील्यांदाच विमान प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरासमोर फुलांची आरास करून पुर्ण कुंटुबांने अतिशय जल्लोषात लेकी – सुनांचे स्वागत केले.
Be First to Comment