शिवतेज मित्र मंडळ रक्तदान शिबिरात 57 जणांनी केले रक्तदान
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
शिवतेज मित्र मंडळ गंगानगर नेरळच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते . या प्रसंगी एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले 484 वे रक्तदान शिबिर ठरले.
रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त संकलन केंद्र यांचे डॉ. एम. ए. शेख, धनश्री लाड, लता देशक, संजय ठोंबरे, पीयुष सिंघ, अनिकेत जाधव, साहिल पवार, सनी मोरे, शुभम जगताप व कृष्णा साठे आदींनी केले. या प्रसंगी आमिर मणियार , प्रज्ञेश खेडकर तसेच शिवतेज मित्र मंडळाचे तुषार म्हात्रे, मयूर कांबरी, वासुदेव गवळी, संदेश जाधव, मितेश भोईर, नितीन मनवे, पवन सोनावळे, प्रतीक सोनावळे, निवृत्ती कांबरी ,रोशन सातवी आदी उपस्थित होते.

Be First to Comment